100 प्रायव्हेट जेट, पाहुण्यांना कोटींचे रिटर्न गिफ्ट, सुरक्षेसाठी NSG कमांडो, अंबानींचा शाही थाट
100 प्रायव्हेट जेट, पाहुण्यांना कोटींचे रिटर्न गिफ्ट, सुरक्षेसाठी NSG कमांडो, अंबानींचा शाही थाट
img
Dipali Ghadwaje
आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत पार पडणार आहे. शुक्रवारी, 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल. त्याआधी लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सर्व फंक्शन शाही अंदाजात झाले आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी सर्व विधी झाल्या आहेत. आतापर्यंत संगीत, हळदी, साखरपुडा, ग्रँड प्री-वेडिंग सोहळा यासारखे कार्यक्रम पार पडले आहेत. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक  सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते.

प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक  जस्टिन बीबर यानं फरफॉर्म करत उपस्थित पाहुण्यांचं मनोरंजन केले. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट विवाहबंधनात अडकणार आहेत. 13 जुलै रोजी शुभ आशीर्वादचा कार्यक्रम आहे.  ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहे

शाही लग्नात 350 मिलियन डॉलरचा खर्च !
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी 250 पेक्षा जास्त नामंवत पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलेय. पाहुण्यांना येण्या-जाण्यासाठी अंबानी कुटुंबांने तीन फाल्कन-2000 जेट रेंटवर घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक खासगी विमाने वापरण्यात येऊ शकतात, असे क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी एका वृत्त संस्थेशी  बोलताना सांगितले.  एका वृत्त संस्थेच्या वृत्तनुसार, अनंत अंबानींच्या या शाही लग्नासाठी मुकेश अंबानींनी 350 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2500 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.  

विवाह सोहळ्यात कोण उपस्थित राहणार?
ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांना व्यक्तीश: भेट घेत मुकेश  अंबानी यांनी आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे  मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group