अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे बहुचर्चित लग्न 12 जुलै रोजी संपन्न होणार आहे. अंबानी घराण्यातील हे अखेरचे लग्न असून, या लग्नाचा गाजावाजा जगभरात दिसून येतो आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अनंत राधिकाच्या शाही विवाह सोहळ्याच्या विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यामध्ये प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे.
या समारंभासाठी जस्टिन बीबरने अंबानी कुटुंबियांकडून तब्बल 83 कोटीचे मानधन घेतल्याची खबर आहे.अँटिलिया येथे अनंत-राधिकाचा संगीत समारंभ सोहळा आयोजित केला आहे. या मध्ये प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे. त्यासाठी गुरुवारीच तो मुंबई विमानतळावर आपल्या म्यूजिकल ताफ्यासोबत दाखल झाल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
अंबानी कुटुंबाने त्यांच्या धाकट्या मुलाच्या शुभविवाहाचे उद्घाटन 'मामेरू' सोहळ्याने केले. रिहानापासून ते शकीरापर्यंत सर्वांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म केले आहे आणि आता आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करणार आहे.
जस्टिन बीबरने 'बेबी', 'लव्ह मी', 'स्टे', 'वन टाइम', 'ब्युटी अँड अ बीट', 'व्हॉट डू यू मीन', 'लव्ह युवरसेल्फ' आणि 'नेव्हर से नेव्हर' यासह अनेक हिट गाणी गायली आहेत. आणि भारतातही त्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या संगीत समारंभात जस्टिन बीबरच नाही तर इतरही अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत. या ग्रॅण्ड वेडिंगमध्ये अडेल, ड्रेक आणि लाना डेल रेलसारखे सेलिब्रिटी परफॉर्म करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी रिहाना आणि शकीरा यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग समारंभात परफॉर्म केले होते.