मुंबईत लागबागच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं आहे. संपूर्ण जगभरात ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाही जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचरणी दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या या गर्दीचे फोटो व्हायरल होत आहेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी गणेशभक्त येत आहेत. मुंबईतील सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि सिनेकलाकारांचीही मांदियाळी याठिकाणी दर्शनासाठी पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे मोठ्या रांगेत आणि गर्दीत चेंगराचेंगरीत सर्वसामान्य नागरिक दर्शन घेत आहेत. बाप्पांच्या एका पायावर सर्वसामान्य आणि दुसऱ्या पायावर सेलिब्रिटींची दर्शनरांग पाहायला मिळत आहे.
अंबानी कुटुंबातील नवदाम्पत्य अनंत-राधिका अंबानी यांनीही लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. शुक्रवारी रात्री त्यांनी बाप्पाचरणी माथा टेकला. मुकेश अंबानी आपल्या दोन्ही सुना व मुलगा अनंत यांच्यासमवेत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मोठ्या सुरक्षेच्या गराड्यात पण शिस्तीत व शांततेत अंबानी कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.