मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला ढोल वाजविण्याचा आनंद
मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला ढोल वाजविण्याचा आनंद
img
Dipali Ghadwaje
नाशिक :- गणेशोत्सवानिमित्त पंचवटी येथील हिरावाडी रोड वरील त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्री इच्छापूर्ती गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी ढोल वाजविण्याचा आनंद घेतला. यानंतर त्यांनी श्री गणेशाची आरती करत मनोभावे दर्शन घेतले. 

यावेळी त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंत्री छगन भुजबळ यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री श्री भुजबळांनी स्वतः ढोल वाजवत आनंद घेतला.

ढोल पथकाच्या गरजरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत भुजबळ स्वतः ढोल वाजवत असल्याचे बघून सर्वांत उत्साह संचारला होता.
त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ असतात त्रिमूर्ती नगर मित्र मंडळ नावाजलेले मंडळ असल्याने नाशिक मधील प्रतिष्ठित व्यक्ती व प्रमुख मान्यवर श्री इच्छापूर्ती गणेशाची आरतीसाठी आणि दर्शनासाठी येत असतात. 

यावेळी  मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group