नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची निवड झाल्यानंतर नागपूर येथे भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) या तिन्ही पक्षांच्या आमदारांची मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे येवला मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. यामुळे भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आज सकाळी नऊ वाजेपासूनच नाशिक येथील भुजबळ फार्म या भुजबळ यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे काही कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यात अरणगाव, माढा या भागातून आलेले असून काही कार्यकर्ते येवला मतदारसंघातून आलेले आहेत. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच युवक आणि महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. 'भुजबळ साहेब तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है' असे घोषणा देखील हे कार्यकर्ते आता देऊ लागले आहेत. थोड्याच वेळात खुद्द छगन भुजबळ भुजबळ फार्मवर येऊन आपली राजकारणातील पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान भुजबळ फार्मवर लावलेल्या फलकावर केवळ माजी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि दिलीप खैरे यांचाच फोटो असून या बॅनरवरून अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांच्या फोटो गायब झालेले दिसून येत आहेत.
दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्री पद न दिल्याने नाशिक जिल्ह्यातील समता परिषदेचे पदाधिकारी समर्थक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली आहे.
दरम्यान सोमवारी अधिवेशनातून निघून येत त्यांनी थेट नाशिक येथील निवासस्थान गाठले. कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केल्यानंतर आज सकाळी नाशिक येथील भुजबळ फार्म येथे भुजबळ समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार पवार यांना देखील आम्ही भेटून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामावून घ्या याबाबत घालणार असल्याचेही काही समर्थकांनी यावेळी सांगितले. "साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत" अशा आशयाचे बॅनर भुजबळ फार्म परिसरात झळकवण्यात आले आहे. तसेच भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी भुजबळ समर्थक करून देण्यात आल्या. सकाळपासूनच भुजबळ समर्थकांनी भुजबळ फार्म येथे येण्यासाठी गर्दी सुरू केल्याचे दिसून आले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देण्याचा तयारीत
ओबीसी समाजाचा नेता म्हणून भुजबळ यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. परंतु असे असतानाही पक्षाने त्यांना मंत्रिपद न देता मंत्री पद देताना डावलेले. भुजबळ यांना मंत्रिपदापासून वगळण्यात आले, यावर आमचा विश्वासच बसत नाही. साहेब जे सांगतील तेच आम्ही करणार, आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहू असेही यावेळी भुजबळ समर्थंकांकडून सांगण्यात आले.
दिलीप खैरे, अंबादास खैरे, पोपट जेजुरकर, संतोष पुंड, भारत जाधव, मच्छिंद्र माळी, ज्ञानेश्वर माळी, गोविंद माळी, मुकेश शेवाळे, अमोल नाईक, आशा भंदुरे, सुरेश भाबड, संतोष भुजबळ आदिंचा समावेश आहे.