"....म्हणून अजितदादांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांने पदभार स्वीकारला नाही" , नेमकं काय घडतंय ?
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील घटक पक्षात सुरु असलेले नाराजी नाट्य संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. या ना त्या कारणावरून नाराजी पुढे येत आहे. त्यामुळे तीन घटक पक्षाची नाराजी दूर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्ती केली होती. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता दत्तात्रय भरणे नाराज असल्याने मंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला नाही. क्रीडा मंत्री भरणे हे नॉट रिचेबल असल्याचे समजते.

क्रीडा खाते मिळाल्याने दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अजूनही आपल्या मंत्रि‍पदाचा कारभार स्वीकारलेला नाही. नाराज असल्याने ते सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती आहे. दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. त्याचा पदभार त्यांनी अद्याप घेतलेला नसल्याचे समजते.

दरम्यान, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब परदेशात गेले आहेत. क्रीडा खाते मिळाल्याने ते नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीसाठी सहकुटुंब परदेशात गेले आहेत. ते थेट मंगळवारी भारतात येतील, अशी माहितीही त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने दिली आहे.

इंदापूर मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणाऱ्या दत्तात्रय भरणेंची ओळख उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू म्हणून आहे. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे.

त्यामुळे ते नाराज असल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक दिवस उलटून देखील त्यांनी कारभार स्वीकारलेला नाही. दरम्यान, आता ते सुट्टीसाठी सहकुटुंब परदेशात गेले आहेत. त्यांच्या नाराजीची चर्चा मतदारसंघात देखील आहे. त्यामुळे आता त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर केली जाते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group