राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रणशिंग फुंकले आहे. मंत्रिपदाच्या विस्तारानंतर अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यांनी बुधवारी मोठा निर्णय जाहीर केला.
छगन भुजबळ म्हणाले, गावागावातून, जिल्ह्यातून फोन येत आहे. भुजबळ साहेब या. ताकद वाढवा. होय खरे आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्या बैठकीत छगन भुजबळ यांनी हा निर्णय जाहीर केला.
छगन भुजबळ की, आपल्याला व्होकल मंत्री हवे, व्होकल नेते पाहिजे. जे आमच्यासाठी बोलतील. ही आपली लढाई आहे. परत आवाज द्यायला सुरुवात झाली आहे. पण ही लढाई आमदार म्हणून सभागृहामध्ये लढणार आहे. तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असा थेट इशारा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना त्यांचे नाव न घेता दिला.