मोठी बातमी  : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक ; केली
मोठी बातमी : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक ; केली "ही" मोठी मागणी
img
Dipali Ghadwaje
पंढरपूर : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या मागणीला विरोध केला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता या वादात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे.  

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला बसले होते. लक्ष्मण हाके यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. यानंतर मराठा क्रांती मोर्चाने मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध कायम ठेवला आहे. लक्ष्मण हाके यांचं उपोषणस्थळ वडीगोद्री येथूनही छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध कायम ठेवला.

यावरून मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर यांनी आक्रमक भूमिका घेत छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.  क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर म्हणाले की, 'मुख्यमंत्री शिंदे, तुम्हाला विनंती करतो की, संवैधानिक पदावर बसून कुठल्याही समाजाविरोधात आकस निर्माण करतो.

तेच मंत्री मराठा समाजाला सतत टार्गेट करत असेल. मराठा समाजाच्या मागणीला विरोध करत असेल. अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. यामुळे महाराष्ट्रसुद्धा शांत राहील'.
इतर बातम्या
Join Whatsapp Group