“राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवस पुरेल''? छगन भुजबळांनी दिली मोठी माहिती
“राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवस पुरेल''? छगन भुजबळांनी दिली मोठी माहिती
img
Nandini khandare More

इराण अमेरिका संघर्षांने संपूर्ण जगाला वेठीस धरले असून भारतावर देखील याचे विपरीत परिणाम झाले आहे. परिणामी देशात महागाई वाढली आहे तर इंधनाच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान आता महाराष्ट्राही अनेक ठिकाणी इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचदरम्यान आता एक मोठी अपडेट ससमोर येत आहे. 

महाराष्ट्रात राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून लोकंही चिंतेत आहे. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

” राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये”, असं माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले. ” गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली ” अशी माहिती त्यांनी दिली.

“देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group