समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? यावर मंत्री छगन भुजबळांनी दिली ही प्रतिक्रिया
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? यावर मंत्री छगन भुजबळांनी दिली ही प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वत्र बैठकांची सरबत्ती सुरु आहे. 

माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र नांदगावला शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहे. सुहास कांदे यांना नांदगावमधून तिकीट मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

त्यामुळे समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. तर अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का? याची चाचपणी समीर भुजबळ यांच्याकडून सुरू असल्याचे बोलले जात होते. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, समीर भाऊ माझ्याबरोबर आहेत. आम्ही अजितदादा सोबत आहोत. आम्ही काम करत आहोत. तो येवल्यामध्ये काम करणार आहे. आता या बातम्या कशा आल्या. याबाबत माहित नाही. समीर भाऊंनी उभं राहावं, असं तुमच्या मनात आहे का?  या बातमीत तथ्य नाही. त्यांना मुंबईमध्ये काम आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी जावं लागेल. नाशिकमध्ये लक्ष ठेवावे लागेल. येवल्यात लक्ष घालावे लागेल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group