"माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते - छगन भुजबळ"
img
Dipali Ghadwaje
नाशिक :  राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यात नाराज भुजबळांना थेट कसला वादा अन् कसला दादा असे म्हणत थेट पक्षश्रेष्ठींवरचं हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना असे म्हणत भुजबळांनी एक प्रकारे बंडाचे संकेत दिले असून, भुजबळ त्यांच्या नव्या राजकीय इनिंगची सुरूवात भाजपमध्ये प्रवेश करून करण्याची दाट शक्यता आहे.

काय म्हणाले  छगन भुजबळ ?

मंत्रिपदाचा प्रश्न नाही अवहेलना झाली. पद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस  आग्रही होते. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या अधिक जवळ गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते आगामी काळात भाजपच्या गोटात दाखल होऊन महाराष्ट्र किंवा दिल्लीत कुठेही काम करु शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group