राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे दोन नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर आज मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष आहेत. महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर महाविकास आघाडीत मिळणार आणि महाविकास आघाडीत नाही मिळालं तर महायुतीतून मिळणार असल्यांच म्हटलं आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
पत्रकारांनी आज अजित पवार गटाचे दोन बडे नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत, त्याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता, आपल्याला त्याबाबत माहिती नाही. मात्र इकडे तीन पक्ष, तिकडे तीन पक्ष आहेत. दोघांना तिकीट मिळणार, एक इकडून एक तिकडून. ज्यांना तिकिटे नाही मिळणार ते इकडून तिकडे ते तिकडून इकडे जाणार. इकडे पण आयाराम गयाराम तिकडे पण आयाराम गयाराम होणार. त्याच्यामध्ये फार असे काही नावीन्य नाही. एखादा पक्षाच्या वाट्याला ती जागा येते पण त्यांच्याकडे उमेदवार योग्य नसेल तर दुसरीकडील इच्छुक उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल.