मोठी बातमी! भुजबळ नाराज अन् अजितदादा 24 तासांपासून नॉट रिचेबल ; नेमक घडतयं काय?
मोठी बातमी! भुजबळ नाराज अन् अजितदादा 24 तासांपासून नॉट रिचेबल ; नेमक घडतयं काय?
img
Dipali Ghadwaje
नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मोठी घडामोड घडली आहे. मागील 24 तासांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणालाही भेटले नाही. अजितदादा नॉट रिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागला आहे. महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकीकडे छगन भुजबळांची नाराज आहेत. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील 24 तासांपासून कुणालाच भेटले नाहीत. काल, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपुरातील विजयगड निवासस्थानी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती देण्यात येत आहे.

त्यामुळे अजित पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. तर, दुसरीकडे अजितदादा नॉट रिचेबल नसल्याने चर्चांना उधाण आहे.
 


इतर बातम्या
Join Whatsapp Group