छगन भुजबळांनी केले फडणवीस यांचे भरभरुन कौतूक ; म्हणाले.....
छगन भुजबळांनी केले फडणवीस यांचे भरभरुन कौतूक ; म्हणाले.....
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत महत्वाचा दावा केला आहे. राज्यात महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. ज्या वेळेस 3 पक्षांची युती असते तेव्हा सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. त्या निर्णयासाठी काही वेळेस महिना, महिना देखील लागला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही. येत्या दोन-चार दिवसांत शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासंदर्भातील फॉर्म्युला आज निश्चित होणार आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरुन काम करणार असल्याचे सांगितले. परंतु पक्षाने आदेश दिला आणि ते उपमुख्यमंत्री झाले.

त्यावेळी ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. परंतु त्यांनी पूर्णपणे कामाला झोकवून दिले. आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देण्याचे काम त्यांनी केले. सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर कुठे गदा येऊ नये यासाठी फडणवीस यांनी सहकार्य केले आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group