राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे येथे दौऱ्यावर होते.
ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आज त्यांना अधिक त्रास जाणवल्याने दुपारी पुणे येथून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन भुजबळांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.