महायुतीत अजित पवार गटाचा किती जागांवर दावा, काय म्हणाले छगन भुजबळ ?
महायुतीत अजित पवार गटाचा किती जागांवर दावा, काय म्हणाले छगन भुजबळ ?
img
दैनिक भ्रमर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत दरम्यान , सध्या राजकारणात  जागावाटपावरूनही मोठी रणधुमाळी पाहायला मिळते आहे .  महायुतीतील जागापाटपावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीने महायुतीत किती जागांवर दावा केलाय, यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 महायुतीत अजित पवार गट किती जागांवर लढणार? याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आकडा सांगितला आहे. आमचे जे कारभारी आहेत. अजितदादा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे त्यांना माहिती आहे की जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत आली आहे ते. मी काही त्या चर्चेमध्ये जास्त लक्ष घालत नाही. मला काही जास्त माहिती नाही. पण अजित पवारांनी महायुतीत 80 ते 90 जागा मागितल्या आहेत. त्यातल्या किती मिळणार? किती निकाल येतो, मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.

तसेच ते पुढे म्हणाले की , प्रत्येकजण आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देत असते ते मला माहिती नाही. महायुती सरकाराने जे कार्यक्रम सुरु केले. आश्वासन नाही, घोषणा नाही. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना सोलर पंप विज आणि वीज माफ असेल. विद्यार्थ्यांना स्टाईपेन, मुलींना मोफत शिक्षणाचे असेल या योजना सुरु झाल्या. आम्ही आश्वासने दिली नाही. पेन्शन योजनेमध्ये सुद्धा मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दोन-तीन पर्याय शोधण्यात आले आहेत. पर्याय त्यांना मान्य असेल तो पर्याय त्यांना स्वीकारण्याची मुभा देण्यात आली, असं छगन भुजबळ म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group