१८ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर व परिसरातील ग्रामीण भागात काल निघालेल्या गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. मित्रांसोबत विसर्जनसाठी आलेले दोन जण वालदेवी नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.
शहरात गणेशोत्सवाच्या विसर्जन सर्वत्र शांततेत व सुरळीत सुरु असतांना दुसरीकडे वालदेवी नदीत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र या घटनेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. पण, या घटनेत पाथर्डी रोडवरील समर्थनगर येथील म्हाडा कॉलनी जवळ असलेल्या साई अव्हेन्यू इमारतीतल राहणार्या स्वयंम भैया मोरे (वय 24) व ओमकार चंद्रकांत गाडे (वय 23) या तरुणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावले. पण, या तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान, मागील वर्षी देखील गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडाल्याची दुर्घटना घडली होती. विशेष म्हणजे वालदेवी धरणातच दोघेजण बुडाले होते. त्याचीच पुनरावृत्ती यंदा देखील झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मागील वर्षी अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी युवक बुडाल्याची घटना घडली होती. त्यातच आज नाशिक मधील गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले होते. पाच वेगवेगळ्या घटनेत आठ जण बुडाले होते. चेहेडी संगम परिसरात महाविद्यालयीत तरुण बुडाला होता. शहरातील गोदावरी नदीत दोन आणि इगतपुरीतील वालदेवी धरणात दोन गणेशभक्त बुडाल्याची घटना घडली होती. आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये काल सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळत होता. सुमारे 21 हुन अधिक मंडळ या मिरवणुकीत सहभागी झालेली होती. अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना रात्री घडली आहे. रात्रीया दोघांचाही बचाव पथकाकडून शोध घेतला होता, तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Copyright ©2024 Bhramar