काळीज हेलावून घटना! मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, अन् अघटित घडलं......
काळीज हेलावून घटना! मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, अन् अघटित घडलं......
img
Dipali Ghadwaje
राज्यभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरु असतानाच लातूरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलगा तलावात बुडत असल्याचे पाहून वडील मदतीला धावले मात्र दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय .  बाप-लेकाच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूनंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या जळकोट तालुक्यामध्ये बाप- लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नामदेव त्रिपती पवार (वय, १२) असे मृत मुलाचे तर त्रिपती बापूराव पवार वय (42) असे वडिलांचे नाव आहे.

जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील शेतकरी त्रिपती बापूराव पवार वय (42) आणि 12 वर्षीय मुलगा नामदेव त्रिपती पवार हे दोघे बापलेक बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावाकडे गेले होते , दरम्यान बैल धुवून बाहेर येत असताना बैल खोल पाण्यात जात असल्याने मुलगा नामदेव हा बैलांना बाहेर काढण्यासाठी गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात गटांगळ्या खात होता. मुलाला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या बापाला भीतीपोटी मुलाने गच्च पकडून धरल्याने दोघेही गाळात अडकले आणि यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

नक्की वाचा >>>> मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात

दरम्यान या घटनेची माहिती जवळच असलेल्या शेतकऱ्यांना मिळाली आणि त्यांनी इतर शेतकऱ्यांना बोलून या दोघांनाही बाहेर काढले., मात्र दोघांचाही जागीच दुर्दैवी अंत झाला होता. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा जळकोट येथील पोलीस अधिकाऱ्यांनी केला व दोघांचेही मृतदेह शवविच्छधानासाठी जळकोट येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. बाप-लेकाच्या मृत्यूनंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group