''या'' शहरात गणेश विसर्जनासाठी 17 रस्ते बंद
''या'' शहरात गणेश विसर्जनासाठी 17 रस्ते बंद
img
दैनिक भ्रमर

 गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मुख्य रस्ते संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.  पुणे शहरातील मुख्य रस्ते संध्याकाळी 5 वाजलेनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात  आले आहेत .दरम्यान, आता गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. 

दरम्यान , वाहतूक शाखेकडून वाहनांच्या पार्किंगसाठी 27 ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे.  मिरवणुकीची सांगता झाल्यानंतरच हे प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत. मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सुरु होणार आहे. त्यामुळे मिरवणूक सुरू होण्यापूर्वी पुण्यातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे.

कशी असणार पार्किंग व्यवस्था 

विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आले आहे हे पार्किंग व्यवस्था न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी आणि चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), फर्गुसून कॉलेज (दुचाकी आणि चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते माडगीळ पूल (दुचा आणि चारचाकी) या ठिकाणी करण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group