गणेशोत्सवासाठी कोकणात जायचंय? मग ही बातमी वाचाच!
गणेशोत्सवासाठी कोकणात जायचंय? मग ही बातमी वाचाच!
img
Dipali Ghadwaje
मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी लगबग सुरु आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फुल झालं आहे. यादरम्यान आता गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा कोकण आणि मध्य रेल्वेने केली आहे.

येत्या आठवडाअखेरीस घरोघरी बाप्पा विराजमान होणार असल्याने उत्सवात कोकणात जाण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण पूर्ण झालं आहे. मात्र, कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा कोकण आणि मध्य रेल्वेने केली आहे.

शनिवारी ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. अनेक मुंबईकरांनी संभाव्य गर्दीचा त्रास टाळण्यासाठी शनिवारीच खरेदीला सुरूवात केली. यामुळे दादर, भुलेश्वर, माटुंगा, क्रॉफर्ड मार्केट अशा सर्वच ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. 

पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी ३५ दिवसांचा ब्लॉक सुरू आहे. यामुळे खरेदीसाठी निघालेल्या प्रवाशांचे ब्लॉकमुळे मेगाहाल होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा कोकण आणि मध्य रेल्वेने केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group