भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज देशभरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. शिल्पा शेट्टी, नाना पाटेकर तसेच अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणेशोत्सवात विशेष कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात येतं. तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता…म्हणत अनेक मराठी कलाकारांच्या घरी आज बाप्पा विराजमान झाले आहेत. आता पुढचे दहा दिवस सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अभिनेत्री सायली संजीवने घरच्या बाप्पाची झलक सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाचं आगमन झालं आहे.
तर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी तिच्या भावाच्या साथीने बाप्पाची सुबक मूर्ती घडवते. घरच्या घरी बाप्पाची मूर्ती घडवून सोनालीने मनोभावे पूजा केली आहे.
रुपाली भोसले, शशांक केतकर, अंकिता लोखंडे, जुई गडकरी, सुयश टिळक, सुशांत शेलार या सगळ्या कलाकारांनी आपल्या घरी बाप्पाचं मनोभावे स्वागत केलं आहे.
दरम्यान, छोट्या पडद्यावरील सगळ्याच मालिकांमध्ये आता गणेशोत्सवाचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. त्यामुळे पुढचे दहा दिवस सर्वत्र उत्साहाचं वातावरण असणार आहे.
ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं आहे. यावेळी त्याच्याबरोबर आई, पत्नी व मुलगा देखील उपस्थित होते.
सुबोधनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.