गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनावेळी दगडफेक; नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनावेळी दगडफेक; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
बंगळुरू : देशभरात गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी गणेशोत्सवाला गालबोट लागलंय. कर्नाटकात मांड्या इथं गणेश विसर्जनावेळी हिंसाचाराची घटना घडलीय.

मिळालेल्या माहितीनुसार , दोन धर्मात झालेल्या वादातून परिस्थिती इतकी बिघडली की वातावरण तणावपूर्ण झालं. समाजकंटकांनी काही दुकाने बाइक शोरूम आणि कपड्याच्या दुकानांना आग लावली. यात दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. रस्त्यावर उभा असलेल्या दुचाकींनाही आग लावण्यात आली.

यामुळे तणाव वाढला असून दोन्ही समुदाय हिंसाचार करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला. कलम १६३ लागू केले आहे. लोकांना एकत्र जमण्यास आणि गर्दी करण्यास बंदी असून असं केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

नेमकं काय घडलं?

बदरिकोप्पलु गावातील तरुण गणपतची विसर्जन मिरवणूक काढत होते. मिरवणूक नागमंगलाच्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मशिदीजवळून जात असताना काहींनी दगडफेक केली. यामुळे वातावरण बिघडलं आणि दोन्ही समुदायात वाद झाला. याचवेळी काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहने पेटवली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत या प्रकरणात जबाबदार असलेल्या लोकांना अटक करावी अशी मागणी केली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group