गणेशोत्सवाला गालबोट! गणपती बसवलेल्या मंडपावर दगडफेक ;
गणेशोत्सवाला गालबोट! गणपती बसवलेल्या मंडपावर दगडफेक ; "इतक्या" जणांना अटक, वाचा नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
देशभरात गणेशोत्सवाची धूमधाम सुरु आहे. देशभरात लाडक्या गणपती बाप्पााच्या भक्तीमध्ये लोक तल्लीन झाले आहेत. मात्र सुरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीनंतर जनक्षोभ पेटला होता. त्यानंतर गाड्यांची तोडफोड-जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. सूरतमधील सैयदपुरा भागात काही समाजकंटकांनी गणपती मंडपावर दगडफेक केला.

त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक हिंदू समुदायामध्ये प्रचंड संताप दिसून आला. शेकडो लोकांनी सय्यदपुरा पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने केली आहेत. या प्रकरणात 6 आरोपींना आणि इतर 27 लोकांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त गणेशभक्तांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत, कारवाईची मागणी करण्यात आली.  गणपती मंडपावर दगडफेक झाल्यानंतर लोकांचा राग अनावर आला. आक्रोशात असणाऱ्या लोकांनी सैयदपुरा पोलीस चौकीला घेराव घातला. लोकांना शांत कऱण्यासाठी स्थानिक आमदार कांती बलर घटनास्थळावर पोहचले होते. आरोपींना सोडलं जाणार नाही, असे अश्वासन दिले. त्यानंतर लोकांचा राग शांत झाला. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

गृहमंत्री काय म्हणाले? 

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ व्हिजुअल्स, ड्रोन व्हिजुअल्स आणि अन्य साहित्याची सध्या पडताळणी केली जात आहे. सर्व आरोपींच्या विरोधात सख्त कारवाई करण्यात येईल. पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा तपास केला जात आहे.


दगडफेकीनंतर सूरतमधील लोक उग्र झाले होते. त्यांना शांत कऱण्याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला. गर्दी हाताबाहेर जातेय असे दिसल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याशिवाय अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. त्याशिवाय इतर २७ जण ताब्यात आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सूरतच्या सर्व भागात पोलीस तैनात आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group