नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा दंगल प्रकरणात गुन्हा दाखल झालेले माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट हे आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका जुन्या २८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात त्यांना आज कोर्टानं दोषी जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निकालामुळं भट्ट हे चर्चेत आले आहेत.
काय आहे प्रकरण?
पालनपूर इथं सन १९९६ मध्ये अंमली पदार्थ्यांशी संबंधित NDPS कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना या प्रकरणी बुधवारी, २७ मार्च रोजी पालनपूर सेशन कोर्टात हजर करण्यात आलं. याठिकाणी कोर्टानं त्यांना दोषी जाहीर केलं.
गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीवेळी बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तत्कालीन आपीएस अधिकारी असलेले संजीव भट्ट यांना तपास यंत्रणेनं कारवाई केली होती. त्याचबरोबर याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार यांच्यावरही गुन्हे दाखल झाले होते.
या तिघांनी खोटी शपथपत्रे तयार करुन तत्कालीन गुजरामधील नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचं कट-कारस्थान रचल्याचा आरोप केला होता.