गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई ; ८०० कोटींचे लिक्विड एमडी ड्रग्ज जप्त
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई ; ८०० कोटींचे लिक्विड एमडी ड्रग्ज जप्त
img
Dipali Ghadwaje
ठाणे : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) भिवंडी-वाडा मार्गावर एका मेफेड्रोन (एमडी ड्रग्ज) उत्पादन युनिटवर छापा टाकून तब्बल ८०० किलोचे लिक्विड मेफेड्रोन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत ८०० कोटी रुपये आहे. गुजरातेतील भरुच जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीवरही एटीएसने धाड टाकून ३१ कोटींचे लिक्विड ट्रामाडोल जप्त केले. या कारवाई चार जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरात एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ५ ऑगस्ट रोजी भिवंडीतील युनिटनर धाड टाकली. तिथे लिक्विड मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती केली जात होती. या कारवाईत एटीएसने मोहम्मद युनुस शेख (४१) आणि त्याचा भाऊ मोहम्मद आदिल शेख (३४) या दोघांना अटक केली. या दोन्ही भावांनी आठ महिन्यांपूर्वी एक फ्लॅट भाड्याने घेत विविध रसायनांचा वापर करत मेफेड्रोनची निर्मिती सुरू केली होती. त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता.

मात्र, आता त्यांनी आता लिक्विड स्वरूपातील मेफेड्रोन बनविण्यात यश मिळविले होते, अशी माहिती गुजरात एटीएसचे पोलिस उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी दिली.  १८ जुलै रोजी गुजरातेतील पलसाणा येथून तिघांना अटक करत त्यांच्याकडून ५१ कोटींचा कच्चा माल हस्तगत केला होता. त्यांच्याकडून शेख बंधूंची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भरुचमधील कारवाईत दोघांना एटीएसने अटक केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group