धक्कादायक! मुलांच्या अंगावर कोसळली शाळेची भिंत , व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! मुलांच्या अंगावर कोसळली शाळेची भिंत , व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
img
Dipali Ghadwaje
मुंबई : सध्या देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहे. अशातच गुजरात राज्यातील वडोदरा येथे वेगळाच प्रसंग समोर आला आहे. येथे मुलं वर्गात बसलेली असताना त्या वर्गाची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एक मुलगा जखमी झालेला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

याबात मिळालेल्या माहितीनुसार 19 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. गुजरात राज्यातील वडोदरा येथील श्री नारायण गुरुकूल स्कूल या शेळात ही दुर्घटना घडली. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान ही घटना घडली. 

शाळेच्या मुख्याध्यापिकांनी काय सांगितले?
शाळेच्या मुख्याध्यापिका रुपल शाह यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. "आम्ही अचानकपणे मोठा आवाज ऐकला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत एका मुलाच्या डोक्याला मार लागला आहे. या घटनेनंतर आम्ही इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठाकणी नेलं," असं रुपल शाह यांनी सांगितलं. 


 एक विद्यार्थी जखमी
ही दुर्घटना घडल्यानंतर वडोदरा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने बचावमोहीम राबवली. जखमी झालेला विद्यार्थी हा इयत्ता सातवी आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती बरी आहे. 

अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. एक वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर विचारलं. आम्हाला बचावासाठी कॉल आल्यानंतर आम्ही लगेच घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तसेच 10 ते 12 सायकल्सची मोडतोड झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group