धक्कादायक घटना! १४ व्या मजल्यावरुन उडी मारणार होता, दोन जणांनी वाचवला जीव , व्हिडीओ आला समोर
धक्कादायक घटना! १४ व्या मजल्यावरुन उडी मारणार होता, दोन जणांनी वाचवला जीव , व्हिडीओ आला समोर
img
Dipali Ghadwaje
१४ व्या मजल्यावरुन उडी घेणाऱ्या तरुणाला दोन जणांनी वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील असल्याचे समजतेय. सुपरटेक केपटाऊन सोसायटीमधील इमारतीच्या १४व्या मजल्यावरुन एकाने उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. पण दोन तरुणांनी अतिशय चपळाईने त्याचा जीव वाचवला. या घटनेचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ समोरच्या इमारतीवरुन काढलेला दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार , १४ व्या मजल्यावरुन उडी घेणारा तरुण मानसिक आजाराने त्रस्त आहे. ज्यावेळी तरुण १४ व्या मजल्यावरुन उडी घेत होता, त्यावेळी खाली राहणाऱ्या तरुणांनी पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पायऱ्यावरुन धाव घेत वाचवले. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नोएडामधील सेक्टर ७४ मध्ये असणाऱ्या सूपरटेक केपटाउनमध्ये ही घटना घडली. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तरुण 14व्या मजल्यावरील बाल्कनीतून हाताने लटकत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर इमारतीमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. या आवाजानंतर खालील मजल्यावरच्या दोन लोकांनी प्रसंगावधान राखत पायऱ्यांवरून धावत आले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मागून दोन लोक येतात आणि त्याला खेचून सुरक्षित स्थळी नेतात. त्या दोन जणांमुळे दुर्देवी घटना टळली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group