Video: 'नारी शक्तीला सलाम', माय-लेकीने मोठ्या हिमतीने केला सशस्त्र दरोडेखोरांचा सामना
Video: 'नारी शक्तीला सलाम', माय-लेकीने मोठ्या हिमतीने केला सशस्त्र दरोडेखोरांचा सामना
img
दैनिक भ्रमर
हैदराबाद: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक आई आणि मुलीचं धाडस दाखवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मार्शल आर्ट्समध्ये निपुण एक महिला आणि तिच्या तरुण मुलीने दोन चोरांचा लुटण्याचा प्रयत्न हाणून पाडला. हैदराबादमधील बेगमपेट येथे त्यांच्या घरी डिलिव्हरी कामगार असल्याचं भासवून दोन सशस्त्र चोर घर लुटण्यासाठी आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की , उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असलेल्या दोन्ही संशयितांनी घर शोधल्यानंतर ते लुटण्याचा कट आखला होता. त्यांची योजना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली, जेव्हा त्यांनी स्वतःला डिलिव्हरी एजंट दाखवत घरात प्रवेश केला. घराची मालकीण अमिता महनोत घरात असतानाही एक नोकर हे पॅकेज घेण्यासाठी गेला होता.


पोलिसांच्या अहवालानुसार, दोन पुरुष घरात शिरले. एकाने हेल्मेट घातलेलं होतं आणि दुसऱ्याने आपली ओळख लपवण्यासाठी मुखवटा घातलेला होता, त्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. संशयितांपैकी एकाने स्वयंपाकघरात जाऊन चाकूने मोलकरणीला धमकावलं, तर अमिताच्या मुलीनं धैर्याने दुसऱ्या घुसखोराचा सामना केला, ज्यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली.

46 वर्षीय अमिता यांनी दरोड्याच्या प्रयत्नाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या मुलीला साथ दिली. बाचाबाची दरम्यान संशयितांपैकी एकाने घरातील पिस्तूल काढून आई आणि मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या मार्शल आर्टच्या कौशल्याचा फायदा घेत अमिताने त्याला नि:शस्त्र केलं आणि मारहाण करून तिथून हाकललं. आवाज ऐकून शेजारीही मदतीसाठी धावले. एका चोराला पकडण्यात ते यशस्वी झाले, तर दुसऱ्याला नंतर पोलिसांनी पकडलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group