Viral Video : संसदेत तुफान राडा, खासदारांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं ; जाणून घ्या काय आहे कारण
Viral Video : संसदेत तुफान राडा, खासदारांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं ; जाणून घ्या काय आहे कारण
img
DB
जॉर्जिया देशाच्या संसदेत सोमवारी (ता. १५) तुफान राडा झाला.  सोमवारी जॉर्जियाच्या संसदेत सत्ताधारी पक्षाचे प्रमुख बोलत होते. यावेळी एका खासदाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. संसदेमध्ये फॉरेन एजेन्ट नावाचे एक विधेयक आणले जात होते. हे विधेयक वादग्रस्त ठरले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.

'फॉरेन एजेन्ट' या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. दरम्यान  वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही बाजूंच्या खासदारांनी एकमेंकाना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांनी एकमेकांच्या अंगावरील कपडे देखील फाडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

जॉर्जिया देशातील संसदेत 'फॉरेन्स एजेन्ट' विधेयक मांडले जाणार आहे. मात्र, विधेयक मांडण्याआधीच याला जनतेने मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. 'फॉरेन्स एजेन्ट' विधेयकाविरोधात नागरिकांनी अनेक ठिकाणी आंदोलने सुरु केली आहे.

अशातच, जॉर्जियाच्या संसदेत सोमवारी सत्ताधारी पक्षाचे प्रमुख बोलत होते. यावेळी त्यांनी 'फॉरेन एजेन्ट' विधेयकावरील उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. याला विरोधी पक्षातील खासदारांनी जोरदार विरोध दर्शवला. यावेळी दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरु झाली.


एका खासदाराने सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यावरून दोन्ही बाजूंचे खासदार आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही, तर एकमेकांच्या अंगावरील कपडे देखील फाडले.

यामुळे जॉर्जियाच्या संसदेत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group