महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याचदरम्यान, परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परीक्षा केंद्रात खळबळ उडाली.
काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात स्पर्धा परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना घडली होती. या परीक्षेचा पेपर लीक झाल्याने उमेदवारांना पुन्हा पेपर द्यावे लागत होते. आता असाच प्रकार बारावीच्या बोर्डाच्या पेपरमध्येही झाला आहे. परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
बोर्डाच्या प्रचंड खबरदारीनंतरही परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. बारावीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये बायोलॉजी पेपरचे प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळून आले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पेपर हा बोर्डाच्या परीक्षेचाच पेपर असल्याचा दावा केला जात आहे.