साऊथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का : दिग्गज अभिनेते आणि डीएमडीके पक्षाचे नेते विजयकांत यांचे निधन
साऊथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का : दिग्गज अभिनेते आणि डीएमडीके पक्षाचे नेते विजयकांत यांचे निधन
img
Dipali Ghadwaje
लोकप्रिय तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं समोर आलं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  

विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. MIOT रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

वियकांत यांनी 2005 मध्ये देसिया द्रविड कडगम या पक्षाची स्थापना केली होती. 2006 मध्ये त्यांनी तामिळनाडू निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयकांत यांचा विजय झाला होता. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमडीकेला यश आलं. 41 जागांपैकी 29 जागा पार्टीला मिळाल्या होत्या. 

तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा म्हणजे विजयकांत. ते DMDK पक्षाचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष होते. 2011 ते 2016 दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी काम केलं आहे. तसेच टॉलिवूडमधील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. 154 सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. 

विजयकांत यांनी 154 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. चेन्नईत विजयकांत यांचं एक इंजीनियरिंग कॉलेज आणि कोयम्बेडु नावाचा लग्नाचा हॉल आहे. अभिनेते असण्यासोबत ते निर्माता आणि दिग्दर्शकही होते.  विरुधाचलम आणि ऋषिवंदियम या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. 

विजयकांत यांचा सिनेप्रवास 
विजयकांत यांनी 'इनिक्कुल इलामाई' या सिनेमाच्या माध्यमातून 1979 रोजी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. एमए काजा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. विजयकांत यांचे नूरवथु नाल, वैदेगी काथिरुंथाल, कूलिएकरन, वीरन, वेलुथांबी, उझवान मगन हे सिनेमे त्याचे सुपरहिट ठरले आहेत.

विजयकांतने विविध सिनेमांत अष्टपैलू भूमिका साकारल्या आहेत. पण अॅक्शन हिरो म्हणूनही ते लोकप्रिय होते. विजयकांत यांचे अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर झाले आहेत. फिल्मफेअर पुरस्कासह अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group