सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन
सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन
img
दैनिक भ्रमर
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं आहे. ते ९० वर्षांचे होते.  बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल हिने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. मुंबई सेंट्रल इथल्या वोकार्ट हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळी 6.38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिया बेनेगल यांनी सांगितलं की, तिचे  वडील दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. अंतिम संस्काराबाबत निर्णय घेतला जाईल.

 श्याम बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल असे असून त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैद्राबादमधील त्रिमुलागिरी येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर बेनेगल स्वतः एक छायाचित्रकार होते. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहाण्याची खूप आवड होती. त्यांच्या या छंदाला कुटुंबियांनीही प्रोत्साहन दिले. त्याकाळी प्रभात, मेहबूब आणि न्यू थिएटर्स सारख्या स्टुडिओंनी निर्माण केलेले चित्रपट त्यांच्या कुटुंबातील सारे सदस्य आवडीने पहात असत. त्यामुळे बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला. याच वर्षी त्यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता.

तसेच, श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. झुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो, मंडी, आरोहण, वेलकम टू सज्जनपूर यांसारखे डझनभर उत्तम चित्रपट त्यांनी केले आहेत. श्याम बेगेनल यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही बहाल करण्यात आलाय. त्यांच्या कारकिर्दीत 24 चित्रपट, 45 माहितीपट आणि 1500 जाहिरात चित्रपट बनवले आहेत. 1976 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. 1991 मध्ये श्याम बेगेनल यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group