"या" प्रसिद्ध अभिनेत्रीने नवऱ्यासोबत सुरु केला नवा व्यवसाय
img
Dipali Ghadwaje
अभिनेत्री मृणाल दुसानिस चार वर्षांनी भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर तिने मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. तिची 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. मृणालच्या मालिकेची चर्चा सुरु असताना तिच्या व्यवसाय क्षेत्रातील पदार्पणाचीही बातमी समोर आली आहे. 

मृणाल दुसानिसने  तिचा नवरा नीरज मोरेसोबत ठाण्यात हॉटेल सुरु केलं आहे. हॉटेल सुरु करण्याचं दोघांचंह स्वप्न पूर्ण झाल्याने मृणाल दुसानिसने काय प्रतिक्रिया दिली आहे, ते जाणून घेऊयात. मृणालने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की,'' आम्ही दोघांनी मिळून ठाण्यामध्ये 'बेली लाफ्स बिस्त्रो अँड टॅप' नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आहे.

मृणालचा नवरा नीरज या व्यवसायाविषयी म्हणाला की, ''मी अमेरिकेत एका कॅफेमध्ये नोकरी करत असतानाच मी स्वतःच काहीतरी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला आयटी कंपनीत नोकरी मिळाली. या सगळ्यामध्ये 15 वर्षांचा कालावधी गेला. पण हॉटेल सुरु करण्याची इच्छा मनात कायम होती. माझं हॉटेल सुरु करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मृणालची खूप मदत झाली. 

मृणालने पुढे सांगितलं की,'' हे रेस्टॉरंट म्हणजे आमचं दोघांचं स्वप्न होतं. हॉटेल सुरु करण्याबाबत आमचं दोघांचंही एकमत झालं. फूड इंडस्ट्री त काहीतरी नवीन करण्याची आमची इच्छा आज पूर्ण झाली. आमचं स्वप्न साकार झालं आहे. या प्रवासात आम्हाला अनेक जणांनी साथ दिली. आयुष्यात कोणतीही गोष्ट सोपी नसते. त्यात व्यवसाय करायचा म्हणजे प्रचंड मेहनतीचं काम आहे. आमच्या छोट्या लेकीला सांभाळून हा प्रवास सुरु करत आहोत. या प्रयत्नांना यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. ''

मृणाल आणि नीरजच्या नव्या हॉटेलचं 17 नोव्हेंबरला उद्घाटन झालं. यावेळी वंदना गुप्ते, शर्मिष्ठा राऊत, ज्ञानदा रामतीर्थकर, विदिषा म्हसकर, राजश्री निकम, आकांक्षा गाडे, शशांक केतकर इत्यादी अनेक कलाकार उपस्थित होते.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group