राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवार 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्वीकारली असून याचं कनेक्शन सलमान खानसोबत जोडण्यात आलंय. यानंतर आता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्याही जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मुनव्वरच्या सुरक्षेमध्येही वाढ करण्यात आलीये.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या चौकशीत ही माहिती समोर आलीये. मुनव्वर सध्या दुबईत असून तो भारतात येताच त्याची सुरक्षा वाढवणार आहेत.
दरम्यान या आरोपींनी मुनव्वर दिल्लीत ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याचीही रेकी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुनव्वर बिष्णोई गँगच्या रडावर असल्याचं सांगण्यात येत आहे.