दिग्गज अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी अभिनय विश्वाचा निरोप घेतला असला तरी, त्या आजही उत्तम नृत्य करतात. वयाच्या 75 व्या वर्षी देखील हेमा मालिनी नृत्याप्रती असलेली त्यांची आवड जोपासताना दिसतात. आता देखील हेमा मालिनी यांनी सुंदर सादरीकरण केलं.
हेमा मालिनी यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हेमा मालिनी त्यांच्या नृत्याच्या माध्यमातून कथा सांगताना दिसत आहेत.
सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. नवरात्रीचं निमित्त साधत एका कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी शास्त्रीय नृत्य सादर केलं आहे. वयाच्या 75 व्या वर्षीही त्यांनी आपल्या नृत्यातून भारताचा सांस्कृतिक वारसा सुंदरपणे दाखवला आहे.
हेमा मालिनी यांनी मथुरा येथील नव दुर्गा महोत्सवादरम्यान आई दुर्गेच्या रुपात उत्तम सादरीकरण केलं. जवळपास दोन तास हेमा मालिनी यांनी मंचावर स्वतःची कला सादर केल . ज्यामध्ये त्या भस्मासुर या राक्षसाचा वध करताना दिसल्या. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेमा मालिनी यांनी दुर्गा सप्तशतीवर आधारित नृत्यनाट्यात दैवी स्त्रीचे सामर्थ्य दाखविले. हेमा मालिनी यांनी माता सती आणि पार्वती बनून लोकांची मने जिंकली. चाहत्यांना देखील हेमा मालिनी यांचं नृत्य आवडलं आहे. चाहते देखील व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत.
उत्तम नृत्य सादर केल्यानंतर हेमा मालिनी यांनी महत्त्वाचा संदेश देखील दिला. हेमा मालिनी म्हणाल्या, ‘शैक्षणिक शिक्षण फार महत्त्वाचं आहे. पण त्यासोबतच मुलांमध्ये कलेबद्दल देखील प्रेम निर्माण करता आलं पाहिजे. कला व्यक्तिमत्त्वासाठी चांगली असून स्वावलंबनाची भावना वाढवते.’ असं देखली हेमा मालिनी म्हणाल्या.