'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात
'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात
img
Dipali Ghadwaje
रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री रेशमा शिंदे अखेर लग्नबंधनात अडकली आहे. 



अभिनेत्री रेश्मा शिंदेचा 29 नोव्हेंबर रोजी लग्नसोहळा पार पडला आहे.  



कुटुंबिय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत रेश्माचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.



रेश्मा शिंदेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नवरदेवासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत खुशखबर शेअर केली आहे.  



रेश्मा आणि पवन लग्नाच्या फोटोमध्ये मॅचिंग वेडिंग लूकमध्ये फार गोड दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. 



अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या नवऱ्याचं नाव पवन आहे. रेश्माने आपल्या होणाऱ्या जोडीदाराविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group