"पुष्पा २" च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू अन् अनेकजण जखमी
img
Dipali Ghadwaje
अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पुष्पा २ च्या प्रीमियर शोदरम्यान हैदराबादमधील थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. यावेळी उसळलेल्या गर्दीत एक महिला ठार झाली आहे तर तिची दोन मुलं गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. मात्र याआधीच ती कायदेशीर अडचणीत अडकली आहे. यामागचे कारण सांगितले जात आहे की हा चित्रपट वेळेपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसून आली, ती पोलिसांनी लाठीचार्ज करून पळवण्याचा प्रयत्न देखील केला. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक जखमी झाले. चेंगराचेंगरीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

खरे तर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट ‘पुष्पा २’ सकाळी ६ वाजता चित्रपटगृहात दाखवला जाणार होता. मात्र अनेक चाहते चित्रपटगृहांमध्ये कायदा मोडून पहाटे तीन वाजता उपस्थित झाले. 500 ते 1500 रुपये किंमत असलेल्या चित्रपटाच्या तिकिटांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.  
 
अल्लू अर्जुन काल हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरला आला होता. त्यांना पाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित होते. अशा स्थितीत या अभिनेत्याला पाहण्यासाठी चेंगराचेंगरी झाली, आणि चाहत्यांमध्ये गोंधळ उडालेला दिसून आला. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेलया लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी परिसराला वेढा घातला आणि थिएटरचे दरवाजे बंद केले. दुसरीकडे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांनाही पाचारण करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करतानाही दिसत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group