झहीर खान-सागरिकाच्या घरी गोंडस बाळाचे आगमन , पोस्ट शेअर करत 'हे' खास नाव केले जाहीर...
झहीर खान-सागरिकाच्या घरी गोंडस बाळाचे आगमन , पोस्ट शेअर करत 'हे' खास नाव केले जाहीर...
img
Dipali Ghadwaje
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. झहीर -सागरिका आई-बाबा बनले असून त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. जहीर-सागरिकाला मुलगा झाला असून त्या तिघांचा एक खास फोटो पोस्ट करत त्यांनी मुलाचं नावही जाहीर केलं आहे.

‘प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादासह आम्ही आमच्या मुलाचे, फतेहसिंह खान याचे स्वागत करत आहोत.’ ब्लॅक अँड व्हाईट 2 फोटोंसह अशी कॅप्शन लिहीत त्यांनी मुलाचं नाव सर्वांना सांगितलं आहे.

एका पोस्टमध्ये सागरिका-झहीर आणि त्याच्या कुशीत झोपलेला लेक दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नवजात बाळाचं बोट पकडलेला क्लोज अप फोटो आहे. त्यांच्या या पोस्टवर आणि फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत असून अनेकांनी कमेंट सेक्शनमधून त्यांचं अभिनंदन करत लहान बाळालाही आशिर्वाद दिले आहेत.


चक दे इंडिया सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या सागरिका घाटगे आणि भारताचा माजी नामवंत गोलंदाज झहीर खान या दोघांचं लव्ह मॅरेज असून 23 नोव्हेंबर 2017 साली त्यांनी एकमेकांशी सलग्न केलं. त्याआधी बराच काळ ते एकमेकांना डेट करत होते. आता त्यांच्या घरी पुत्ररत्नाचं आगमन झालं असून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे.   


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group