प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान रुग्णालयात, नेमकं झालं काय?
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान रुग्णालयात, नेमकं झालं काय?
img
Dipali Ghadwaje
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

हिनानं आपल्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन याबाबत माहिती दिली आहे. तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिनाला ताप आल्यानं तिला अडमिट करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तिनं तिचे रुग्णालयातील फोटो देखील यावेळी शेयर केले आहेत. त्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत हिनाला काळजी घेण्यास सांगितले आहे.

हिनानं तिच्या इंस्टा अकाउंटवरुन शेयर केलेला फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा विषय आहे. हिनाला १०२ एवढा ताप असल्याचे तिनं म्हटले आहे. गेल्या चार रात्री मी काही झोपलेले नाही. मी तापानं खूप बेजार आहे. ताप काही कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. अशातच मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. खूपच अशक्तपणा आला आहे. असेही हिनानं म्हटले आहे.

हिनाच्या प्रोजेक्टविषयी पाहायचे झाल्यास तिचा कंट्री ऑफ ब्लाईंड नावाचा चित्रपट २०२४ च्या ऑस्करसाठी नॉमिनेट झाल्याचे बोलले जात आहे. त्यात तिनं केलेली भूमिका चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का सेन, शोएब निकाश शहा, नमिता लाल, इनाम उल हक, प्रद्युम्न सिंग मॉल आणि जितेंद्र राय यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group