हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. 'ये है मोहोब्बते' या हिंदी मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेलीअभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे. तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून दोन हाडं निखळली आहे. आज तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिव्यांकाचा पती अभिनेता विवेक दहियाने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली. काल रात्रीच तिच्या अपघाताची बातमी समोर आली आहे.
मिळालेलया माहितीनुसार, दिव्यांका त्रिपाठीचा हा अपघात खूप जास्त मोठा असल्याचे समजत आहे. त्यामुळे दिव्यांका आणि विवेक पुढील काही दिवस काम करणार नसल्याचेही विवेकने सांगितले आहे. दिव्यांकाचा अपघात कसा झाला, याबाबत विवेकने माहिती दिली आहे.
विवेकने पोस्टमध्ये लिहले आहे की, 'आम्हाला हे सांगायला खूप जास्त दुः ख होत आहे की, उद्याचे लाइव्ह सेशन पोस्टपोन करण्यात आले आहे. काही तासांपूर्वी दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आहे. तिच्यासध्या उपचार सुरु आहे. विवेक तिची काळजी घेत आहे. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. दिव्यांका लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा. आम्ही तुमच्याशी लवकरत संवाद साधू'.
विवेकने इन्स्ट्राग्रामवर अजून एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात त्याने दिव्यांकाच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. 'दिव्यांका मॅडमच्या हाताची दोन हाडे तुटली आहेत. उद्या त्यांची सर्जरी होणार आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे', असं त्याने म्हटलं आहे.
दिव्यांकाचा अपघात कुठे झाला, कधी झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दिव्यांकाच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. चाहते दिव्यांकाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहे.