",,,,,म्हणून मुंबईतल्या हॉटेलांचे दर वाढले" , एका दिवसासाठी मोजावे लागणार "इतके" पैसे
img
Dipali Ghadwaje
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा चालू आहे. येत्या १२ जुलै रोजी हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. मूळ लग्न समारंभ सुरू होण्यापूर्वी सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ अंबानींच्या राहत्या घरी म्हणजेच अँटालिया बंगल्यावर पार पडला.

यासाठी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी खास हजेरी लावली होती. दरम्यान, अनंत-राधिकाचं लग्न मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार आहे. शुक्रवारी, १२ जुलै रोजी अनंत-राधिका सात फेरे घेतील. शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडींगला आलेल्या पाहुण्यांपेक्षा अधिक पाहुणे त्यांच्या लग्नाला येणार आहेत. भारतासह जगभरातील सेलिब्रेटी, कलाकार, खेळाडू, उद्योगपती आणि राजकारणी या लग्नाला येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमधील पाहुण्यांची संख्या वाढली आहे. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मुकेश अंबानी यांनी मुंबई विमानतळाच्या आसपास आणि वांद्रे कुर्ला संकुलातील अनेक पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग करून ठेवलं आहे. 

या भागातील अनेक पंचतारांकित हॉटेलं फुल आहेत. तसेच हॉटेलांमधील खोल्यांचं भाडं देखील वाढलं आहे. हॉटेल बुकिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेवसाईट्सवरील माहितीनुसार ९ जुलै रोजी ट्रायडंट बीकेसीमधील एका रुमसाठी १०,२५० रुपये अधिक टॅक्स, १५ जुलै रोजी १६,७५० रुपये अधिक टॅक्स आणि १६ जुलै रोजी १३,७५० रुपये अधिक टॅक्स असे पैसे मोजावे लागतील. तसेच १० जुलै ते १४ जुलैदरम्यान या भागातील जवळपास सर्वच हॉटेलांमधील रूम्स बूक केलेले आहेत. हॉटेल वेबसाईवर १० जुलै ते १४ जुलैपर्यंतच्या कोणत्याही तारखा निवडल्या तर तिथल्या रूम्स सोल्ड आऊट असल्याचं सांगितलं जात आहे.

जियो वर्ल्ड सेंटरच्या आसपास असलेल्या पंचतारांकित हॉटेलांमधील रूम्सचे दर सात पटींनी वाढले आहेत. १० ते १४ जुलैच्या दरम्यान येथील हॉटेलांचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. ज्या हॉटेलांमध्ये एक रात्र राहण्यासाठी १३,००० रुपये मोजावे लागत होते, त्याच हॉटेलांमधील एका रूमसाठी ९१,३५० रुपये (एका रात्रीसाठी) मोजावे लागत आहेत.

अंबानीपुत्राच्या शाही विवाहामुळे आमदारांसाठी हॉटेल मिळेना!

विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी आमदारांना सुरक्षित जागी ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी उद्योगपती मुकेश अंबानी पुत्राच्या शाही विवाहामुळे मुंबईत पंचतारांकित हॉटेल्स मिळणे कठीण झाले आहे. यामुळेच भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group