बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी देण्यात आली आहे. मंडी हे तिचं मूळगाव आहे.मंडीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच कंगनाने एक पोस्ट शेअर करत भाजप श्रेष्ठींचे आभार मानलेत.
काय म्हणाली अभिनेत्री कंगना रनौत?
माझा नेहमीच भाजपला बिनशर्त पाठिंबा राहिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आज मला माझ्या जन्मभूमी हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतचा निर्णय घेतला. त्याबद्दल आभार..., असं कंगना म्हणाली आहे. अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल मला सन्मान आणि आनंद वाटतोय. मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक होण्यासाठी मी उत्सुक आहे. मनापासून आभार, असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या प्रतिभा सिंह विद्यमान मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र ही जागा जिंकण्यासाठी भाजपने अभिनेत्री कंगना रनौतला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे इथं कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं असेल.
दरम्यान, कंगनाला पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे.कंगनाने अनेक दर्जेदार बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे केलेत. क्विन, तनू वेड्स मनू, तेजस, मणिकर्णिका, या सिनेमांमध्ये कंगनाने काम केलं आहे. तर इमजेन्सी हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगनाने अनेक दर्जेदार बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे केलेत. क्विन, तनू वेड्स मनू, तेजस, मणिकर्णिका, या सिनेमांमध्ये कंगनाने काम केलं आहे. तर इमजेन्सी हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.