आम्ही पती-पत्नीसारखं राहिलो, मी तिला माझ्या आयुष्यातील ..; कंगना राणौतबद्दल जेव्हा अभिनेत्याने केला खुलासा
आम्ही पती-पत्नीसारखं राहिलो, मी तिला माझ्या आयुष्यातील ..; कंगना राणौतबद्दल जेव्हा अभिनेत्याने केला खुलासा
img
वैष्णवी सांगळे
बॉलिवूडची रोखठोक अभिनेत्री म्हणून कंगना राणौत ओळखली जाते. लव्ह आणि ब्रेकअपच्या कंगनाच्या देखील अनेक कहाण्या समोर आल्या. कंगना राणौत आणि आदित्य पांचोली यांच्या लव्हस्टोरीच्या तर अनेक कहाण्या रंगल्या. दोघानीही विविध मुलाखतीत एकमेकांवर अनेक आरोप केले. 

आदित्य पांचोली त्याच्या करिअर आणि चित्रपटांपेक्षा अधिक अभिनेत्री कंगना राणौतसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअपमुळे चर्चेत राहिला. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा कंगना नुकतीच इंडस्ट्रीत आली होती आणि विवाहित आदित्यवर तिचं प्रेम जडलं होतं. मात्र त्यांच्या नात्यातील हा गोडवा फार काळ टिकू शकला नाही. जेव्हा कंगना आणि आदित्यमध्ये खटके उडाले, तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या.

कंगनाने आदित्यला तिच्या वडिलांच्या वयाचा असल्याचं म्हटलं होतं. “या व्यक्तीने माझ्या डोक्यावर मारलं होतं आणि त्यामुळे रक्त येत होतं. मीसुद्धा माझी चप्पल काढली आणि त्याच्या डोक्यावर जोरात मारलं”, असा धक्कादायक खुलासा कंगनाने केला होता. तर आदित्यनेही एका मुलाखतीत कंगनाला केलेल्या मदतीचा आणि तिच्यासोबत पती-पत्नीसारखं राहिल्याचा उल्लेख केला होता. 

कंगनाने आणखी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या वडिलांच्या वयाच्या आदित्य पांचोलीने तिला घरात बंदी बनवून ठेवलं होतं. अखेर स्वत:ला वाचवण्यासाठी तिने पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली होती. नंतर आदित्यने कंगनावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. कंगनाने आदित्यवर शारीरिक शोषणाचा आरोप करत तक्रारही दाखल केली होती. कंगना २१ वर्षांची असताना त्यांच्या पाच वर्षांच्या नात्याचा शेवट झाला होता. 

आदित्यने एका मुलाखतीत कंगनाची बहीण रंगोलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर तिची कशी मदत केली याविषयीही सांगितलं होतं. “मी तिच्या बहिणीच्या प्लास्टिक सर्जरीवर 10 लाख रुपये खर्च केले होते. पण मी ते पैसे तिच्याकडून काही परत मागत नाही. मी सर्व बिल भरले. मी सर्वकाही माफ केलंय. आम्ही पती-पत्नीसारखे राहत होतो. मी यारी रोडवर आमच्या दोघांसाठी घर बांधत होतो. ती वापरत असलेला फोनही माझाच होता. तिच्यासाठी मी माझं लग्नही पणाला लावलं होतं. मी तिला माझ्या आयुष्यातील पाच वर्षे दिली होती. तिने स्वत:बद्दल सत्य सांगावं एवढीच माझी इच्छा होती”, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group