कंगना प्रकरण पडलं महागात.. कुलविंदर कौरची
कंगना प्रकरण पडलं महागात.. कुलविंदर कौरची "या" राज्यात बदली; काय आहे "हे" प्रकरण
img
Jayshri Rajesh
अभिनेत्री कंगना रणौत यांचा  खासदार म्हणून नवीन प्रवास सुरू झालाय. हिमाचल इथल्या मंडी मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीला निघालेल्या कंगनावर एका महिला पोलिसानं हल्ला करत तिच्यावर हात उचलला होता. या घटनेवर कंगना नाराज झाली होती. तसंच या महिला कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही कंगनाने केली होती.

नेमकं काय आहे प्रकरण ?

काही दिवसापूर्वी दिल्लीला जाण्यासाठी खासदार कंगना चंदीगड विमानतळावर दाखल झाल्यानंतर ही घटना घडली होती. विमानात चढण्यापूर्वी कंगनाची सुरक्षा तपासणी सुरूअसताना ‘सीआयएसएफ’च्या महिला पोलिसाने तिच्या कानशीलात लावली होती.

या घटनेनंतर कंगनानं व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला होता.‘पंजाबमध्ये दहशत आणि हिंसाचारात झालेली वाढ धक्कादायक आहे,’ असं तिनं म्हटलं होतं. चंदीगड विमानतळावर ‘सीआयएसएफ’च्या महिला पोलिसाने आपल्या कानशीलात लावुन शिवीगाळ केल्याचा आरोप कंगनानं केला होता. आपण सुरक्षित आणि ठीक आहोत; पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादाबद्दल काळजी वाटत असल्याचं तिनं म्हटलं होतं. तसं कंगनानं त्या महिला अंमलदाराला विचारलं, की तिनं असं का केलं? त्यावर तिनं सांगितलं, की ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाची समर्थक आहे.’

कुलविंदरची या राज्यात बदली

कंगनाला कानशीलात लावणाऱ्या कुलविंदर या महिला पोलिसावर आता कारवाई करण्यात आली आहे. या पोलिस कॉन्स्टेबलची बदली करण्यात आल्याचं समोर आलं आहे.सीआईएसएफकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कुलविंदरची बदली चंदीगडहून थेट बेंगळुरू इथं करण्यात आली आहे. या घटनेनंतर कुलविंदर हिच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group