अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट ; काय म्हणाले डॉक्टर?
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट ; काय म्हणाले डॉक्टर?
img
Dipali Ghadwaje
मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  

मराठी सिनेसृष्टीसोबतच दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. काल सयाजी शिंदे यांच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सयाजी शिंदे यांची हेल्थ अपडेट डॉक्टरांनी माध्यमांसोबत बोलताना दिली.

काय म्हणाले डॉक्टर?
डॉक्टरांनी माध्यमांना सयाजी शिंदेंच्या हेल्थबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे यांना छातीमध्ये थोडासा डिसकम्फर्ट जाणवत होता. त्यामुळे त्यांनी रुटीन चेकअप करुन घेतले. त्यांची two d echocardiography जेव्हा आम्ही केली तेव्हा आम्हाला जाणवलं की, त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल कमी आहे. आम्ही त्यांची अँजिओग्राफी केली, तेव्हा हार्टच्या तीन रक्त वाहिन्यांपैकी दोन रक्त वाहिन्या नॉर्मल होत्या आणि एका रक्त वाहिनीमध्ये 99 टक्क्यांचा ब्लॉक अढळला होता. त्यांची प्रकृती आता ठीक आहे."

सयाजी शिंदे हे त्यांच्या समाजिक कार्यामुळे देखील चर्चेत असतात. 'झाडे लावा-झाडे जगवा' असा संदेश ते चाहत्यांना देत असतात. पर्यावरणाच्या संबंधित असणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

सयाजी शिंदे यांचे चित्रपट
सयाजी शिंदे यांनी हिंदी, साऊथ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा घर बंदूक बिरयानी हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटात सयाजी शिंदे यांच्यासोबतच आकाश ठोसर, सायली पाटील,नागराज मंजुळे यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच गेल्या वर्षी रिलीज झालेल्या एकदा येऊन तर बघा या चित्रपटात देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. अशातच आता सयाजी शिंदे यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group