सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी हरियाणातील फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरपाल सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो 37 वर्षांचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हरपाल सिंगने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला आज विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 सलमान खानच्या घरावर गोळीबार

14 एप्रिल 2024  रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर  गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.  मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्र पुरवणाऱ्या दोघांना पंजाबमधून अटक केली होती.  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने  25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group