बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिला तिकीट मिळालं आहे. मंडीची मुलगी असलेली कंगना जोरदार प्रचार करण्यात व्यस्त आहे. या निवडणुकीत तिचाच विजय होईल, असा तिला विश्वास वाटत आहे. एका वृत्त वाहिनीशी खास बातचीत करताना कंगनाने चित्रपट, लोकसभा निवडणूक आणि राजकारण याविषयी सांगितलं याच दरम्यान कंगनाने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली.
अभिनेत्रीने जर लोकसभा निवडणूक जिंकली तर ती हळूहळू शोबिजचं जग सोडू शकते, असे संकेत दिले. कारण तिला फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
कंगनाला विचारण्यात आलं - ती चित्रपट आणि राजकारण कसं मॅनेज? यावर अभिनेत्री म्हणाली, मी चित्रपटात भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. जर मला राजकारणात वाटलं की लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत. तर मी राजकारणच करेन. आयडियली मला एकच काम करायला आवडेल.
जर मला वाटत असेल की लोकांना माझी गरज आहे तर मी त्या दिशेने जाईन. मंडीतून जिंकले तर मी फक्त राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्माते मला राजकारणात जाऊ नको असं सांगतात. मी एक प्रिव्हिलेज आयुष्य जगले आहे, जर आता मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी ती स्वीकारेन.
मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे. अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, राजकारणातील जीवन हे चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हे सर्व सुखावणारं आहे का? उत्तरात कंगना म्हणाली - हे चित्रपटांचे खोटे जग आहे. त्यातून वेगळं वातावरण तयार केलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक बबल तयार केला जातो. पण राजकारण हे वास्तव आहे. मला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, मी लोकसेवेत नवीन आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे.