मराठा आंदोलक जरांगेंच्या भेटीसाठी निघालेल्या नवनिर्वाचित खासदाराच्या गाडीला अपघात
मराठा आंदोलक जरांगेंच्या भेटीसाठी निघालेल्या नवनिर्वाचित खासदाराच्या गाडीला अपघात
img
Dipali Ghadwaje
बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे.  बीडची लढत ही अत्यंत चुरशीची झाली.  बीडमध्ये निवडणूक अधिकारी कडून विजयाचा सर्टिफिकेट घेतल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी लोकांसोबत जल्लोषांमध्ये सहभाग घेतला. 

बीडमध्ये मराठा आरक्षणाचा व मनोज जरांगे फॅक्टर जाणवल्याचं दिसून आलं.   त्यामुळे निकालानंतर रात्रीच बजरंग सोनवणे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीसाठी जात असताना अपघाात झाला.  बजरंग सोनावणे हे मध्यरात्रीच जरांगेच्या भेटीसाठी निघाले त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  बजरंग सोनवणेंच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनावणेंच्या गाडीला धडकली.या अपघातात काही जखमी झाले. या जखमींवर उपचार सुरू आहेत. रात्री अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

हा अपघात जालना जिल्ह्यातील  धुळे- सोलापूर महामार्गावर रात्री उशीरा झाला. मध्यरात्री ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे जात असताना शहागड पुलाच्या बाजूला ताफ्यातील एक कार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला येऊन धडकली.. ताफ्यातील गाडी धडकल्याने बजरंग सोनवणे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला मात्र तिथून अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे सोनवणे यांनी भेट घेतली..

जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वांत मोठा परिणाम मराठा आरक्षण आंदोलनाचा झाला असून बजरंग सोनवणेंच्या विजयाला हे आंदोलन व जरांगे कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे. कारण, ऐन निवडणुकांत ओबीसी विरुद्ध मराठा या वादाने बीड लोकसभा मतदारसंघात चांगलाच जोर धरला होता. त्याचा थेट लाभ उमेदवार बजरंग सोनवणे यांना झाल्याचं दिसून येत आहे.  

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group