'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन'; पोलिसांकडून शेतकऱ्याला धमकी
'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन'; पोलिसांकडून शेतकऱ्याला धमकी
img
वैष्णवी सांगळे
बीडमधील गुन्हेगारी ही महाराष्ट्रासाठी आता नवीन राहिली नाही. बीडमधील वाढणाऱ्या हत्या , अपहरण यामुळे सर्वसामान्य बीडकर हैराण झाले आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पवनचक्की कंपनीकडून मावेजा (भरपाई) मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, ओ२ Renewable या पवनचक्की कंपनीचा वीजपुरवठा करणारा टॉवर आणि विद्युत तारा शेतकरी गणेश झोडगे आणि कृष्ण कुडके यांच्या शेतातून जात असल्याची माहिती आहे. कंपनीकडून योग्य मावेजा न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतल, काम थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. 

नेकनूर पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी, दत्ता बळवंत, सचिन मुरूमकर आणि सचिन गर्जे तिन्ही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दत्ता बळवंत संतप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांना धमकी दिली. 'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन बेट्या', अशी शब्दांत त्यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे.या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी या घटनेचा विरोध दर्शवला.

दरम्यान, या घटनेबाबत पोलीस दत्ता बळवंत यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला. त्यांनी स्पष्टीकरण दिलं की, 'तो व्हिडिओ आमचाच आहे. शेतकरी टॉवरचे नट - बोल्ट काढत होते. आम्ही त्यांना कायदेशीर मार्गानं मावेजा मिळवण्यास सांगत होतो. पण शेतकरी ऐकत नव्हते', असं पोलीस म्हणाले. हे प्रकरण समोर येताच तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. पोलिसांच्या वागणुकीबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Beed |
इतर बातम्या
Join Whatsapp Group