मुंबई : भाजपने विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. यात भाजपाने पंकजा मुंडेंसह तीन ओबीसी नेत्यांना संधी दिली आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. आज पंकजा मुंडे आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी पंकजा मुंडेंनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या वरळीत दाखल झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे दिसून आले.
दरम्यान यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे. जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे आभार मानते. मला प्रतीक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे.
मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी समर्पित करते, असे म्हणत पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्याचे दिसून आले.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
- पंकजा मुंडे
- योगेश टिळेकर
- परिणय फुके
- अमित गोरखे
- सदाभाऊ खोत